आरोग्यसेवा थेट नागरिकांपर्यंत… येलचिल येथे 261 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी!
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने दि. 08 सप्टेंबर 2026 रोजी मौजा येलचिल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली आणि जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात 261 नागरिकांची तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत औषधे देण्यात आली. तसेच 17 नागरिकांना पुढील तपासणी व उपचारांसाठी विविध रुग्णालयांकडे शिफारस करण्यात आली.
आरोग्य शिबिरासोबतच फिरत्या प्रदर्शनीच्या माध्यमातून शहीद जवानांचे बलिदान, C-60 जवानांचे शौर्य आणि गडचिरोली पोलीस दलाच्या विविध नागरी कृती उपक्रमांची माहिती नागरिकांना देण्यात आली.
सन 2021 पासून गडचिरोली पोलीस दलाने 207 आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून 43 हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी केली असून, ‘ऑपरेशन रोशनी’च्या माध्यमातून 9,971 हून अधिक नेत्र तपासण्या व 1,412 मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
सेवेतून विश्वास… आरोग्यातून सुरक्षिततेची साथ!
गडचिरोली पोलीस — सदैव आपल्या सोबत.
#GadchiroliPolice #HealthCamp #Yelchil #CommunityPolicing #PoliceForPeople HealthcareForAll OperationRoshni MaharashtraPolice Gadchiroli
105 views | Gadchiroli, Maharashtra | Sep 8, 2026