दिल्लीच्या राष्ट्रीय मंचावर गडचिरोलीचा गौरव… ‘प्रोजेक्ट उडान’च्या सहभागींचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान!
दिल्ली येथे आयोजित 9 व्या नॉर्थ-ईस्ट स्टुडन्ट फेस्टिवलमध्ये गडचिरोलीच्या समृद्ध आदिवासी संस्कृतीचे प्रभावी प्रतिनिधित्व करणाऱ्या युवक-युवती व आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचा दि. 08 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी सहभागी सदस्यांना रोख बक्षीस देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत 04 आत्मसमर्पित माओवादी सदस्य आणि अनुप डान्स ग्रुपच्या 14 युवक-युवती अशा एकूण 18 जणांनी दिल्लीतील राष्ट्रीय मंचावर पारंपरिक वाद्यांच्या साथीने ‘रेला’ नृत्याचे मनमोहक सादरीकरण केले. या माध्यमातून गडचिरोलीची आदिवासी संस्कृती, लोकपरंपरा तसेच शांतता, एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देशभर पोहोचविण्यात आला.
पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी सर्व सहभागींचे अभिनंदन करत त्यांच्या सादरीकरणाला गडचिरोलीच्या परिवर्तनाची, शांततेची आणि नव्या आशेची ओळख असल्याचे सांगितले. आत्मसमर्पित सदस्यांनीही अतिदुर्गम गडचिरोलीतून देशाची राजधानी दिल्ली येथे आपली पारंपरिक कला सादर करण्याची संधी दिल्याबद्दल गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले.
दुर्गम भागातून दिल्लीच्या राष्ट्रीय मंचापर्यंत…
कलेतून आत्मविश्वास, संस्कृतीतून नवी ओळख!
‘प्रोजेक्ट उडान’ — नव्या गडचिरोलीच्या स्वप्नांना नवी भरारी!
#GadchiroliPolice #ProjectUdaan #NorthEastStudentFestival #RelaDance #TribalCulture YouthEmpowerment PeaceAndUnity NewGadchiroli MaharashtraPolice Gadchiroli
@mramesh_ips @dgpmaharashtra
139 views | Gadchiroli, Maharashtra | Sep 8, 2026