रामटेक: रामटेक येथे परंपरागत बैलपोळा सण उत्साहात साजरा
Ramtek, Nagpur | Sep 10, 2026 कृषी कार्यात बैलांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा सण गुरुवार दिनांक 10 सप्टेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता पासून रामटेक शहरासह रामटेक तालुक्यात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला असून बैल जोड्या नियोजित बैलपोळ्या भरणाऱ्या स्थळी वाजत गाजत पोहचल्या. येथे बैलजोळ्याची पूजा करण्यात आली. तर बैलजोडीधारकांना शाल, श्रीफळ दुपट्टा व भोजारा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.