कळमेश्वर: कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या ड्युटीबाबत चौकशीची मागणी
कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या ड्युटीवेळेतील उपस्थिती, शासकीय सेवेत असताना खासगी वैद्यकीय व्यवसाय तसेच १ ऑक्टोबर रोजी घडलेल्या कथित घटनेबाबत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक मंगेश बिलाधारजी गमे यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे.