कुडाळ: कुडाळातील अभिवाचन स्पर्धेत प्रचिती बांबुळकरने मिळवला प्रथम क्रमांक
कोकण मराठी साहित्य परिषद, कुडाळ शाखेच्या वतीने बाव येथील रामेश्वर माध्यमिक विद्यालयात अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि ललित लेखांचे प्रभावी वाचन या स्पर्धेची खासियत होती.