पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे मा. प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या उपस्थितीत भ्रष्टाचार निर्मूलन सप्ताहानिमित्त रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली.
यावेळी मा. प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरीचे उपअधीक्षक श्री. अविनाश पाटील यांनी उपस्थितांना भ्रष्टाचार निर्मूलन, लाचलुचपत प्रतिबंधक उपाययोजना तसेच शासकीय कामकाजात प्रामाणिकपणा, पारदर्शकता व नैतिक मूल्यांचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #ratnagiri #ratnagiripolice #acb
8 views | Ratnagiri, Maharashtra | Oct 29, 2026