Public App Logo
Profile Picture

रत्नागिरी पोलीस

@ratnagiripolice
70Followers
0Following
Operation TAPE for Safe अंतर्गत गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. चंद्र किशोर मीणा (भा.पो .से) यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते व वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने ठिकठिकाणी उभारण्यात येणाऱ्या पोलीस मदत केंद्रांची, अपघात रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची तसेच पर्यायी मार्गांची माहिती दिली.
ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत, तेथे नागरिकांच्या वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
यावेळी सर्व पोलीस अधिकारी तसेच रस्ता सुरक्षेशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range <nis:link nis:type=tag nis:id=ganeshustav2026 nis:value=ganeshustav2026 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=roadsafety nis:value=roadsafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गणेश मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अरांक्षा यादव , परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अभिजीत थोरात तसेच सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
बैठकीदरम्यान गणेश मंडळांच्या समस्या व सूचना जाणून घेऊन त्यांचे योग्य ते निराकरण करण्यात आले. तसेच नियमांचे पालन करून आगामी सण-उत्सव आनंदात, शांततेत व सुरक्षित वातावरणात साजरा करण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range <nis:link nis:type=tag nis:id=ganeshutsav nis:value=ganeshutsav nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=awareness nis:value=awareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=unity nis:value=unity nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
🚨दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दलाचे नागरिकांना आवाहन...🚨
रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने दहीहंडी उत्सव आनंदात, संयमाने आणि सुरक्षित वातावरणात साजरा करूया. नागरिकांनी दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी, गोविंदा पथकांनी आवश्यक सुरक्षा उपायांचा वापर करावा, तसेच लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. मद्यपान व अंमली पदार्थांचे सेवन करू नये आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास डायल 112, रत्नसेतु चॅटबॉट क्रमांक 9371415612 किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा.
रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range <nis:link nis:type=tag nis:id=safetyfirst nis:value=safetyfirst nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=dahihandi nis:value=dahihandi nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
प्रधानमंत्री सिल्व्हर कप स्पर्धेत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांचा देशात तृतीय क्रमांक💐
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला आणि मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या तंत्रज्ञानाधिष्ठित आधुनिक पोलीसिंगच्या व्हिजनला अनुसरून, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या अभिनव संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या AI आधारित ‘RAIDS’ॲपला प्रधानमंत्री सिल्व्हर कप स्पर्धेत देशात तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व आधुनिक तंत्रज्ञानाचा पोलीस तपास प्रक्रियेत प्रभावी वापर करणाऱ्या या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
या उल्लेखनीय राष्ट्रीय कामगिरीबद्दल मा. पोलीस अधीक्षक  श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांचे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे मनःपूर्वक अभिनंदन..
Narendra Modi CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range <nis:link nis:type=tag nis:id=pmo nis:value=pmo nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=silvercup nis:value=silvercup nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=competition nis:value=competition nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=3rd nis:value=3rd nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, सार्वजनिक गणेशोत्सवाची परवानगी घेण्यासाठी अर्ज आता Citizen Portal द्वारे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
नागरिकांनी Citizen Portal वरून आवश्यक माहिती व कागदपत्रे सादर करून ऑनलाइन अर्ज करावा. सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवेसाठी ऑनलाइन अर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने करण्यात येत आहे.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range 
<nis:link nis:type=tag nis:id=citizenportal nis:value=citizenportal nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganeshustav2026 nis:value=ganeshustav2026 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे सेवानिवृत्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते राखीव पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र कुळसंगे व श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री. विलास दिडपसे यांचा त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत शुभेच्छापत्र, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू प्रदान करून प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेसाठी गौरव करण्यात आला.यावेळी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
CMO MAHARASHTRA Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range <nis:link nis:type=tag nis:id=retirementceremony nis:value=retirementceremony nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
“मिशन फिनिक्स” अंतर्गत रत्नागिरी पोलीस दलातर्फे ‘ड्रग्स फ्री रत्नागिरी’साठी रेन रनचे आयोजन 
“मिशन फिनिक्स” अंतर्गत रत्नागिरी पोलीस दल व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ड्रग्स फ्री रत्नागिरी’ या जनजागृती अभियानासाठी ‘रेन रन’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमास मा. पालकमंत्री डॉ. उदय सामंत तसेच मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित नागरिक व सहभागी धावपटूंना अंमली पदार्थमुक्त रत्नागिरीचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रेन रन मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली.
"मिशन फिनिक्स"अंतर्गत आयोजित या उपक्रमातून अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करत निरोगी, सुरक्षित व नशामुक्त समाजाचा संदेश देण्यात आला.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range <nis:link nis:type=tag nis:id=rainrun nis:value=rainrun nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=saynotodrugs nis:value=saynotodrugs nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=awareness nis:value=awareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/>
प्रधानमंत्री सिल्व्हर कप स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांची भारतातील प्रथम पाच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range <nis:link nis:type=tag nis:id=congratulation nis:value=congratulation nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
🚨रत्नागिरी पोलीसांची मॉडिफाईड सायलेन्सरविरोधात धडक कारवाई करत कर्कश आवाज करणारे १० सायलेन्सर जप्त🚨
रत्नागिरी शहरामध्ये मॉडिफाईड सायलेन्सरचा वापर करून कर्कश आवाज करत ध्वनीप्रदूषण करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात रत्नागिरी पोलीसांकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान कर्कश आवाज करणारे १० मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अभिजीत थोरात यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामार्फत करण्यात आली.
जिल्ह्यातील नागरिकांना त्रासदायक ठरणारे तसेच ध्वनीप्रदूषणास कारणीभूत ठरणारे मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनांवर यापुढेही कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून, वाहनचालकांनी आपल्या वाहनांमध्ये नियमबाह्य बदल करून कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरचा वापर करू नये, असे आवाहन रत्नागिरी पोलीसांकडून करण्यात आले आहे.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
नारळी पौर्णिमेनिमित्त रत्नागिरी पोलीस दलातर्फे सागराला पारंपरिक मानाचा नारळ अर्पण करण्यात आला. मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से. ) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून सागराला मानाचा नारळ अर्पण करण्यात आला.
यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच सर्वांच्या सुख-समृद्धीसह सुरक्षित सागरी प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range <nis:link nis:type=tag nis:id=narlipornima nis:value=narlipornima nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे मा.पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सायबर गुन्हे आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी मा. जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदाल, मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील सायबर फसवणुकीसंदर्भातील गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. तसेच सायबर फसवणूक रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत “मिशन रायझिंग फ्लॉवर्स” व “मिशन सायबर जागृती” अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी दिली.
सदर बैठकीस रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range <nis:link nis:type=tag nis:id=cyber nis:value=cyber nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=crime nis:value=crime nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=awareness nis:value=awareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
रत्नागिरी पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌴🌊 

<nis:link nis:type=tag nis:id=narlipornima nis:value=narlipornima nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=sea nis:value=sea nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=safety nis:value=safety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
रत्नागिरी पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित नागरिकांची माहिती शासनाच्या मदत यंत्रणेकडे तात्काळ उपलब्ध करून द्यावी.
📌 महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र (SEOC)
☎️ आपत्कालीन हेल्पलाईन: 1070 (टोल-फ्री)
📞 SEOC नियंत्रण कक्ष: +91-9321587143
📧 ई-मेल: controlroom@maharashtra.gov.in

➡️ नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती खालील लिंकवर अपलोड करावी:
https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/

CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range <nis:link nis:type=tag nis:id=nepalfloods nis:value=nepalfloods nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=helpingothers nis:value=helpingothers nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
🚨अवघ्या २ तासांत घरफोडी करणारा आरोपी रत्नागिरी पोलीसांच्या ताब्यात🚨
चिपळूण पोलीस ठाणे हद्दीतील मार्गताम्हाणे, गोपाळवाडी येथे अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून चोरी केल्याची घटना घडली होती. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ तपासास सुरुवात केली. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करत अवघ्या 2 तासांत सदर गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीस ताब्यात घेण्यात पथकाला यश आले. आरोपीच्या ताब्यातून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला ₹4,45,842/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद मेंगडे व त्यांच्या पथकाने केली.CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range <nis:link nis:type=tag nis:id=detection nis:value=detection nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
मिशन फिनिक्स अंतर्गत रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील जे.के. फाईल, एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका संशयित व्यक्तीची चौकशी केली असता, सदर व्यक्तीकडे विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेला गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला. सदर इसमाच्या ताब्यातील गांजा व दुचाकी वाहन असा एकूण ₹64,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निलेश माईनकर यांच्या नेतृत्वाखाली परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अभिजीत थोरात व रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range <nis:link nis:type=tag nis:id=saynotodrugs nis:value=SayNoToDrugs nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=RatnagiriPolice nis:enabled=true nis:link/>
रत्नागिरी पोलीस दलाच्या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी व परिणामकारक वापर करून पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने नवीन C.C.T.N.S. Training Centre ची स्थापना करण्यात आली आहे. या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र श्री. चंद्र किशोर मीणा (भा.पो.से.) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) , मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्यासह रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
 तसेच मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. चंद्र किशोर मीणा (भा.पो.से.) यांनी Ratnagiri Police Health Club ची पाहणी करून तेथील उपलब्ध सुविधांची माहिती घेतली.
CMOMaharashtra  Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम   Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range <nis:link nis:type=tag nis:id=cctns nis:value=cctns nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=trainingcenter nis:value=trainingcenter nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
रत्नागिरी पोलीस दलाच्या "Operation TAPE For Safe" अंतर्गत भाटे-पावस रोडवरील अपघातांच्या घटना रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी सदर रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना अपघात प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्यात आल्या. सदर उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी दिले. CMOMaharashtra  Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे  Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range <nis:link nis:type=tag nis:id=roadsafety nis:value=roadsafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=operation nis:value=operation nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=tapeforsafe nis:value=tapeforsafe nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/>
रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका दुकानात चोरीची घटना घडली होती. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी आरोपीचा शोध घेऊन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार, परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अभिजीत थोरात यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवून, सदर दुकानातील कामगाराने फसवणूक करून चोरी केलेला लॅपटॉप, सिलिंग फॅन, स्पीकर आदी एकूण ₹2,13,000/- किमतीचा मुद्देमाल आरोपीसह हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=RatnagiriPolice nis:enabled=true nis:link/>
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी राष्ट्रध्वजास रत्नागिरी पोलीस दलाच्या पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेने सलामी देण्यात आली.
या कार्यक्रमास मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी, रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.
CMOMaharashtra  Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range <nis:link nis:type=tag nis:id=independenceday nis:value=independenceday nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस मुख्यालय कवायत मैदान, रत्नागिरी येथे मा. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजास रत्नागिरी पोलीस दलाच्या पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेने सलामी देण्यात आली तसेच पोलीस दलाची आकर्षक परेड सादर करण्यात आली.
या कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री. मनुज जिंदाल, मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी तसेच रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या उल्लेखनीय व कर्तव्यदक्ष सेवेसाठी ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले.
या राष्ट्रीय पर्वाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालकवर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range <nis:link nis:type=tag nis:id=independenceday nis:value=IndependenceDay nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=tiranga nis:value=tiranga nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=RatnagiriPolice nis:enabled=true nis:link/>
हर घर तिरंगा अभियानांतर्गत रत्नागिरी येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित “हर घर तिरंगा” अभियानाच्या अनुषंगाने आज दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात भव्य तिरंगा रॅली उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आली.
या तिरंगा रॅलीचे नेतृत्व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. उदय सामंत यांनी केले. रॅलीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल, रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी, तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार, विविध शासकीय व प्रशासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
तिरंगा रॅलीदरम्यान देशभक्तिपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला असून नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रध्वजाप्रती आदर व अभिमान व्यक्त केला. यावेळी रत्नागिरी पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रभक्तिपर गीत तसेच राष्ट्रगीताचे मनमोहक वादन करून उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ केली. या उपक्रमाद्वारे “हर घर तिरंगा” अभियानाचा संदेश जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range <nis:link nis:type=tag nis:id=tiranga nis:value=tiranga nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=rally nis:value=rally nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=RatnagiriPolice nis:enabled=true nis:link/>
🚨केबल चोरी प्रकरणातील आरोपी रत्नागिरी पोलीसांच्या ताब्यात🚨
खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या केबल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत खेड पोलीसांनी गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथून ताब्यात घेतले आहे. सदर कारवाईदरम्यान आरोपीकडून चोरीस गेलेल्या केबलमधील तांब्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शैलेश सणस यांच्या नेतृत्वाखाली खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विवेक अहिरे व त्यांच्या पथकाने केली.
CMOMaharashtra  Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे  Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=detection nis:value=detection nis:enabled=true nis:link/>
🚨रत्नागिरी पोलीस दलाची गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर धडक कारवाई🚨
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मिरजोळे येथील नदीकिनारी सुरू असलेल्या अवैध गावठी दारूच्या हातभट्टीवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान हातभट्टीचे साहित्य, तयार गावठी दारू तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे रसायन असा एकूण ₹67,800/- किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली परि. पोलीस उपाधीक्षक श्री. अभिजीत थोरात, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.
CMOMaharashtra  Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
“मिशन रायझिंग फ्लॉवर्स” अंतर्गत महिला सुरक्षा समिती व भरोसा सेल समिती सदस्यांची संयुक्त बैठक संपन्न

रत्नागिरी पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या “मिशन रायझिंग फ्लॉवर्स” उपक्रमांतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे महिला सुरक्षा समितीवरील अशासकीय सदस्य तसेच भरोसा सेल समितीवरील सदस्य यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली.
सदर बैठकीत मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी उपस्थित सदस्यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व उज्ज्वल भविष्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “मिशन रायझिंग फ्लॉवर्स” या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सविस्तर माहिती दिली तसेच या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. बैठकीदरम्यान उपस्थित सदस्यांनी या उपक्रमाच्या उद्दिष्टांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचून जनजागृती व योग्य मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलास आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range <nis:link nis:type=tag nis:id=mission nis:value=mission nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=risingflowers nis:value=risingflowers nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
🚨RAIDS ॲपद्वारे पुनर्निर्मित (Reconstruct) फोटोच्या आधारे अनोळखी मयत पुरुषाची ओळख पटविण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाचे नागरिकांना आवाहन🚨
मंडणगड तालुक्यातील शिपोळे व उमटोली येथील सावित्री नदी व बाणकोट खाडीच्या पात्रातील खाजन परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून, त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस दलाच्या RAIDS ॲपच्या  माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून मयताचे फोटो पुनर्निर्मित (Reconstruct) करण्यात आले आहेत.
सदर मयताची ओळख पटत असल्यास किंवा त्याबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी नियंत्रण कक्ष, रत्नागिरी – 8888905022 / 02352-222222 किंवा बाणकोट पोलीस ठाणे येथे तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलामार्फत करण्यात येत आहे.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम  Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range <nis:link nis:type=tag nis:id=alert nis:value=alert nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>