रत्नागिरी पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न
रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने दि. २९ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांमध्ये रत्नागिरी पोलीस दलातील सर्व अधिकारी व अंमलदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपले क्रीडा कौशल्य दाखविले. स्पर्धेतील विजेत्या अधिकारी व अंमलदारांचा प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते पदके व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.
या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू हा बहुमान प्रल्हाद खोकले यांनी, तर सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू हा बहुमान मंजिरी रेवाळे यांनी पटकावला. तसेच सर्वसाधारण विजेतेपद पोलीस मुख्यालय, रत्नागिरी यांनी मिळविले.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #policegames #ratnagiri #ratnagiripolice
3 views | Ratnagiri, Maharashtra | Oct 31, 2026