रामटेक: ग्रापं शितलवाडी अंतर्गत आनंदनगर महेश नगर के के नगर येथील मार्गांची दयनीय अवस्था
Ramtek, Nagpur | Aug 24, 2026 एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून जुनी ओळख असलेल्या रामटेक शहरालगतच्या शितलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा बघावयास मिळत आहे.24 ऑगस्ट ला पाहणीदरम्यान या ग्रामपंचायतच्या आनंद नगर, महेश नगर के के नगर या परिसरातील रस्त्यांवरून चालणे कठीण झाले आहे. सिमेंट रस्ते पूर्णत: उखडले आहेत.तर त्यांची चाळण झाली आहे. त्यात पाणी साचल्याने गड्ड्यांचा ,त्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. यावरून वाहने तसेच पायी चालणेही कठीण झाले आहे.