महाड: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची रायगड जिल्ह्यात करण्यात येणार प्रभावी अंमलबजावणी
Mahad, Raigad | Sep 4, 2025 गावांचा शाश्वत विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. हे अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणार असून, या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. अशी माहिती आज गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास देण्यात आली. अभियानांतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम तसेच आवश्यक सूचना संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दिल्या आहेत.