जाफराबाद: टेंभुर्णी रेणुका माता मंदिरामध्ये तरुणांनी आणली माहूरगडावरून पायीजोत
आज दिनांक 11 ऑक्टोंबर 2026 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील रेणुका माता मंदिरामध्ये गावातील तरुणांनी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहूरगडावरून थेट टेंभुर्णी येथे पायोजोत आणली आहे, याप्रसंगी या पवित्र ज्योतीचे स्थानिक गावकऱ्यांनी विधिवत पूजन करत दर्शन घेत मंदिरामध्ये स्वागत केले आहे यावेळी गावातील सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित झाल्याचे सुद्धा पाहायला मिळाले आहे.