शहीदांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता… त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी गडचिरोली पोलीस सदैव!
कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या समस्या, अडचणी व गरजा जाणून घेण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दि. 02 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात ‘शहीद कुटुंबीय संवाद बैठकीचे’ आयोजन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित बैठकीत अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या कौटुंबिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित अडचणी व मागण्या जाणून घेतल्या. मांडण्यात आलेल्या समस्यांची नोंद घेऊन त्यांच्या निराकरणासाठी संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.
गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य बजावताना आजपर्यंत 214 सुरक्षा दलाच्या जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्यांच्या शौर्याचा आणि त्यागाचा सन्मान राखत त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी गडचिरोली पोलीस दल विविध उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील आहे.
शहीदांचे बलिदान सदैव स्मरणात…
त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रत्येक सुख-दुःखात गडचिरोली पोलीस सदैव सोबत!
#GadchiroliPolice #MartyrsFamilies #SaluteToMartyrs #PoliceMartyrs #MaharashtraPolice Welfare
75 views | Gadchiroli, Maharashtra | Sep 3, 2026