कुडाळ: बांव शाळेतील मुख्याध्यापिकेला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
बांव येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता वालावलकर यांना राज्यस्तरीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाला आहे. हा सन्मान ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशन कडून देण्यात आला असून, त्यांचा नेतृत्व आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान यासाठी दिला गेला आहे.