कळमेश्वर: कळमेश्वर रेल्वे ट्रॅकवर आढळला मृतदेह,मृत व्यक्तीची ओळख पटली
कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील इंदिरानगर, वॉर्ड क्रमांक १२, कळमेश्वर येथील रेल्वे ट्रॅकवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच मंगेश गमे यांच्या ॲम्बुलन्सने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रोशन आगरकर, आशिष ठाकरे, ललित डेहरिया, संजय मलिक तसेच पोलिसांच्या मदतीने मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर येथे हलविण्यात आला.