बाप्पाच्या उत्सवासाठी सज्ज गडचिरोली… शांतता, शिस्त आणि सुरक्षिततेसाठी पोलिसांचा संवाद!
आगामी गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दि. 03 सप्टेंबर 2026 रोजी संस्कृती सभागृह, गडचिरोली येथे जिल्हास्तरीय गणेशोत्सव मंडळ संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जिल्हाभरातील 500 हून अधिक गणेश मंडळ प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी व पोलीस पाटील सहभागी झाले. यावेळी सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व विसर्जन मिरवणुकीचे नियोजन, ध्वनिक्षेपकाचा वापर, विद्युत सुरक्षा, महिला व बालकांची सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
गणेश मंडळांनी ऑनलाईन नोंदणी करून नियमांचे काटेकोर पालन करावे, सोशल मीडियावरील अफवा व आक्षेपार्ह संदेशांपासून सतर्क राहावे आणि कोणतीही संशयास्पद माहिती पुढे प्रसारित न करता तत्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्याचे आवाहनही करण्यात आले.
पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राबवून गैरकायदेशीर कृत्ये करणाऱ्या व समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या उपद्रवी व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
उत्सव आनंदाचा… जबाबदारी आपल्या सर्वांची!
शांतता • सुरक्षितता • सामाजिक सलोखा
गडचिरोली पोलीस — सदैव आपल्या सोबत!
#GadchiroliPolice #Ganeshotsav2026 #GaneshFestival #EkGaonEkGanpati #SafeGaneshotsav CommunityPolicing SocialHarmony
64 views | Gadchiroli, Maharashtra | Sep 3, 2026