चोरीचा मुद्देमाल परत मिळाला… आणि त्यासोबत परतला विश्वास!
नागपूर शहर पोलिसांनी चोरीच्या विविध गुन्ह्यांमध्ये आरोपींकडून ₹69 लाख 57 हजार 583 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तो त्याच्या खऱ्या हक्कदारांना परत केला.
यामध्ये 172 मोबाईल फोन, 15 नग सोन्या-चांदीचे दागिने आणि 11 दुचाकी वाहनांचा समावेश आहे.
कुणासाठी हा मोबाईल होता, कुणासाठी आयुष्यभराच्या मेहनतीने घेतलेले दागिने… तर कुणासाठी रोजीरोटीचं साधन.
मुद्देमाल परत मिळाल्यावर नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद आणि नागपूर पोलिसांवरील विश्वासच या कारवाईचं खरं यश आहे. ❤️
नागपूर पोलीस — विश्वास, सुरक्षा आणि सेवा. 🇮🇳
#NagpurPolice #NagpurCityPolice #Police #PublicTrust #crimeprevention
297 views | Nagpur, Maharashtra | Sep 1, 2026