कळमेश्वर: आदासा जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात आढळला महाकाय अजगर
अजगर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी; परिसरात पसरली खळबळ
आदासा (धापेवाडा) : आदासा येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात सायंकाळच्या सुमारास एक मोठा अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. शाळेच्या आवारात अजगर दिसताच नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले.अजगराची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.