कळमेश्वर: दहेगाव पेट्रोल पंप जवळ अपघात,24 वर्षीय युवकावर प्राथमिक उपचार
कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील दहेगाव पेट्रोल पंपाजवळ अपघात झाल्याची माहिती मिळताच अपघातग्रस्ताला मदत करण्यासाठी ॲम्बुलन्स तातडीने रवाना करण्यात आली. माहिती मिळताच सामाजिक व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त रंजीत शिवप्रसाद उईके (वय २४, रा. शिवनी, मध्य प्रदेश) यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर येथे दाखल करण्यात आले.