कळमेश्वर: kकळमेश्वर 14 मैल मार्गावर भीषण अपघात, गंभीर जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
कळमेश्वर : कळमेश्वर–१४ मेल रोडवरील केतापारजवळ टेलरने दिलेल्या धडकेत राजू राजाराम पानसे (वय अंदाजे ४० ते ४२ वर्षे, रा. चिलोरे, जि. बैतूल, मध्य प्रदेश) हे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांनी आपल्या ॲम्बुलन्सने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी राजू पानसे यांना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर येथे दाखल केले.