रामटेक: कुरई वनपरिक्षेत्रातील ग्रामसेवन कनहार परिसरात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Ramtek, Nagpur | Oct 6, 2026 कुरई वनपरिक्षेत्रातील बबई बीट मध्ये वाघाच्या हल्ल्यात आपले पशु चारावयास गेलेल्या एका 65 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना 5 ऑक्टोबरला सायंकाळी घडली. ही घटना ग्रामसेवन कनहार क्षेत्रात घडली. घटनेच्या वेळी शेतकरी वनपरिक्षेत्रात पशु चालत होता. याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. यात शेतकऱ्याने घटनास्थळीच प्राण सोडले.