रामटेक: महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती प्रदेश महामंत्री सुधीर जांभुळकर यांचा नियुक्ती नंतर भाजपा द्वारे सत्कार
Ramtek, Nagpur | Oct 6, 2026 सामाजिक कार्यकर्ते तसेच भाजपाचे सक्रिय पदाधिकारी सुधीर जांभुळकर यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती प्रदेश महामंत्री पदी नियुक्ती करण्यात आली. या निमित्ताने भारतीय सेलिब्रेशन सभागृह मनसर येथे मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.