रामटेक: ग्रामपंचायत सोनेघाट जवळील चौघान शिवारात विटांचा ट्रक झाडावर आदळून आठ जण गंभीर जखमी
Ramtek, Nagpur | Sep 1, 2026 रामटेक जवळील ग्रामपंचायत सोनेघाट अंतर्गत चौघान शिवारात विटांनी भरलेला एक ट्रक अनियंत्रित होऊन एका झाडावर आदळल्याने या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार दिनांक 31 ऑगस्टला रात्री घडली. सर्व जखमींना मेडिकल हॉस्पिटल नागपूर येथे उपचारार्थ पाठवण्यात आले.