हिंसेचा मार्ग सोडून नवजीवनाकडे… 50 आत्मसमर्पित सदस्यांच्या पुनर्वसनासाठी गडचिरोली पोलिसांचा पुढाकार!
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने 50 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचा निरोप समारंभ आयोजित करून त्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यांमध्ये सुरक्षितपणे रवाना करण्यात आले.
शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणासह गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत आत्मसमर्पित सदस्यांना आर्थिक सहाय्य, आवश्यक कागदपत्रे, कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण, आरोग्य सुविधा, समुपदेशन आणि सामाजिक पुनर्वसनासाठी विविध प्रकारचे सहकार्य करण्यात आले.
आजपर्यंत 819 माओवादी सदस्यांनी आत्मसमर्पण केले असून, प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून 46 आत्मसमर्पित माओवादी जोडप्यांचे सामूहिक विवाह तसेच 88 आत्मसमर्पित सदस्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी आत्मसमर्पित सदस्यांना आत्मनिर्भर बनून कुटुंबासोबत सुरक्षित, सुखी व सन्मानाचे जीवन जगत समाजाच्या मुख्य प्रवाहात पुढे जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हिंसेपासून शांततेकडे…
आत्मसमर्पणातून पुनर्वसनाकडे…
नव्या ओळखीसह सन्मानाच्या नवजीवनाकडे!
#GadchiroliPolice #ProjectSanjivani #Rehabilitation #NewBeginning #PeaceAndProgress MaharashtraPolice Gadchiroli
191 views | Gadchiroli, Maharashtra | Sep 1, 2026