कळमेश्वर: वरोडा येथे वानर आडवा आल्याने दुचाकीस्वाराचा अपघात
सावनेर रोडवरील वरोडा परिसरात दुचाकीसमोर अचानक वानर आडवा आल्याने दुचाकीस्वाराचा अपघात झाल्याची माहिती आहे.या अपघातात सुनील गजानन शिवणकर (वय ३९), रा. बहुजन नगर, हिंगणा हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर येथे आणण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. रस्त्यावर अचानक वन्यप्राणी आडवे येत असल्याने वाहनचालकांनी सावधगिरी बाळगून वाहनांचा वेग नियंत्रित ठेवावा, असे आवाहन करण्यात आले