कळमेश्वर: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची आमदार यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा (बु.) येथे शेतकरी श्री. नितीन धार्मीक यांच्या शेतावर भेट देऊन सध्याच्या दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी आमदार द्वय मा. डॉ. राजीवजी पोतदार साहेब व मा. आशिषबाबू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, पिकांची परिस्थिती व पाण्याची उपलब्धता याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली.