रामटेक: नहाबी येथे बिबटच्या हल्ल्यात एक बकरा व एक बकरी ठार
Ramtek, Nagpur | Aug 17, 2026 रामटेक येथून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रामटेक वनपरिक्षेत्रातील नहाबी येथे सोमवार दिनांक 17 ऑगस्ट च्या मध्यरात्री अथवा पहाटे च्या सुमारास एका बिबट्याच्या हल्ल्यात घराचे मागे नेहमीप्रमाणे बांधलेला एक बकरा व एक बकरी ठार झाली. बिबट अगदी गावातील घरापर्यंत आल्याने गाववासीयात प्रचंड दहशत आहे. माहितीप्रमाणे नहाबी येथील सुनील चौधरी यांचे हे पशु आहेत.