रामटेक: भगवत कृपा षष्ठी निमित्त महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या भव्य पदयात्रेने दूमदूमले रामटेक शहर
Ramtek, Nagpur | Sep 2, 2026 आनंदधाम रामटेक व्यसनमुक्ती अभियान अंतर्गत भगवत कृपा षष्ठीच्या पर्वावर बुधवार दिनांक 2 सप्टेंबरला महानत्यागी बाबा जुमदेवजी यांची भव्य पदयात्रा रामटेक शहराच्या मुख्यमार्गांवरून काढण्यात आली. ही पदयात्रा नंतर आनंदधाम परिसरात पोहोचून येथे बाबा जुमदेवजी यांच्या स्वागत सोहळ्यात रूपांतरित झाली. येथे बाबांचा सत्कार सोहळा पार पडला.यानंतर मान्यवरांचे स्वागत, चर्चासत्र व उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार घेण्यात आला.