रामटेक: रामटेकच्या अडीच वर्षीय श्रीनिकाच्या जीवासाठी 10 कोटीची गरज; श्रीनिकाची एसएमए आजाराशी झुंज: मदतीसाठी सोशल मीडिया एकवटला.
Ramtek, Nagpur | Sep 9, 2026 राधाकृष्णन वार्ड रामटेक येथील अवघे दोन वर्ष दहा महिने वय असलेली श्रीनिका रोहित माकडे ही सध्या स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी (एसएमए) या दुर्मिळ आजाराशी झुंज देत आहे. या आजाराच्या उपचारासाठी तिला दहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही रक्कम मोठी असली तरी सामाजिक माध्यमातून ही बाब सर्वत्र पसरतात अनेक माणुसकीचे हात आता मदतीसाठी समोर येत आहेत. सर्वांनी यथाशक्ती मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे.