भिवापूर: भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत दंगा नियंत्रणाची घेण्यात आली रंगीत तालीम
#नागपूर_ग्रामीण_पोलीस दिनांक ०७/०९/२०२६ रोजी आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस स्टेशन भिवापूर हद्दीत रूट मार्च व दंगा नियंत्रणाची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी व अंमलदार ढाल, लाठी, हेल्मेट इत्यादी दंगा नियंत्रण साहित्याने सज्ज होऊन दंगा नियंत्रणाचा सराव करण्यात सहभागी झाले.