अवैध गोवंश वाहतुकीवर गडचिरोली पोलिसांचा आणखी एक मोठा प्रहार!
गडचिरोली पोलीस दलाने अवैध गोवंश वाहतुकीविरोधात कठोर कारवाई करत 02 चारचाकी वाहने, 32 गोवंशीय जनावरे व 03 मोबाईल फोनसह एकूण ₹19,60,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. 28 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन आरमोरीच्या संयुक्त पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ठाणेगाव–आरमोरी टी-पॉईंट परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. तपासणीदरम्यान आयसर वाहनामध्ये 26 गायी व 06 बैलांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणात 04 आरोपींना अटक करण्यात आली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. संबंधित आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन आरमोरी येथे विविध कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसाय आणि गोवंश वाहतुकीविरोधात गडचिरोली पोलीस दलाची कठोर कारवाई यापुढेही सुरू