अवैध दारू वाहतुकीवर गडचिरोली पोलिसांची कारवाई
देशी-विदेशी दारू व चारचाकी वाहनासह ₹2,77,600/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
गडचिरोली जिल्ह्यातील अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात पोलीस स्टेशन कुरखेडा पोलिसांनी प्रभावी कारवाई केली आहे.
📍 दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी रात्रगस्तीदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वडसा–कुरखेडा मार्गावर पोलिसांनी सापळा रचला. संशयित पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी रिट्झ वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारू आढळून आली.
कारवाईत जप्त मुद्देमाल :
▪️ देशी दारू – 20 बॉक्स, एकूण 2,000 नग — ₹1,20,000/-
▪️ रॉयल स्टॅग विदेशी दारू – 96 नग — ₹38,400/-
▪️ सह्याद्री गोल्ड विदेशी दारू – 48 नग — ₹19,200/-
▪️ मारुती सुझुकी रिट्झ चारचाकी वाहन — ₹1,00,000/-
💰 एकूण जप्त मुद्देमाल — ₹2,77,600/-
याप्रकरणी सौरभ संतोष डहाळे व मोहन लांजेवार या दोघांविरुद्ध पोलीस स्टेशन कुरखेडा येथे अप. क्र. 193/2026, कलम 65 (अ), 83 म.दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण�