
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत 'आपले सरकार' पोर्टलद्वारे नागरिकांना विविध ऑनलाइन सेवा पुरविण्याबाबत करण्यात आलेल्या ऑक्टोबर २०२६ च्या मूल्यांकनात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने Mission RAPID अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
या मूल्यांकनामध्ये 'Overall Top Performing Service' तसेच 'Service with Highest Citizen Score' या दोन्ही श्रेणींमध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अव्वल स्थान पटकावले आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हे यश संपादन झाले आहे. नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सदैव कटिबद्ध आहे.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #aplesarkar #citizenportal #ratnagiri #ratnagiripolice