छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे फुलंब्री तालुक्यामध्ये शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची होणारी परवड थांबवावी अशी मागणी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.