कर्जत: कर्जत-खोपोली लोकल सेवा ठप्प; प्रवाशांचे हाल
Karjat, Raigad | Jul 7, 2026 मुसळधार पावसामुळे कर्जत- खोपोली मार्गावरील रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. डोलवली ते लौजी मध्यवर्ती ठिकाणच्या रुळावरील खडी वाहून गेल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली. गेल्या दोन - तीन दिवसांपासून राज्यात सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक दिवसांपासून नागरिकांना पावसची प्रतीक्षा होती. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागिरकांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे दिलासा तर मिळाला आहे. पण सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणं, कुठे झाड कोसळणं, कुठे दरड पडणं अशाही घटना सुरूच आहे.