मागील कित्येक वर्षांपासून कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाची प्रतिक्षा आहे. अखेर आता कर्जत-पनवेल मार्गावरील उपनगरीय लोकल सेवा लवकरच पूर्ण होणार आहे. कर्जत - पनवेल या मार्गिकेसाठी डोंगर फोडून एक बोगदा उभारण्यात आला आहे. कित्येक दिवस या मार्गाचं काम सुरू होतं. आता किरवली-वांजळे गावाजवळील 300 मीटर लांबीचा हा नवा बोगदा आता पूर्ण झाला आहे. या बोगद्यात आता रूळ टाकण्याचं काम बाकी आहे. बोगद्याचं काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने या मार्गावरील मोठा अडथळा आता दूर झाला आहे.