रामटेक: गणपती बाप्पाचे रामटेक शहरात उत्साहात आगमन
Ramtek, Nagpur | Sep 14, 2026 गणेश चतुर्थीच्या पर्वावर परंपरागत गणेशोत्सवाला रामटेक शहरात सुरुवात झाली आहे. सोमवार दि.14 सप्टेंबरला सकाळपासूनच शहरात गणेशोत्सवाची लगबग दिसून आली. रामटेक शहराच्या शनिवारी वार्डातील कुंभारपुरा परिसरात घरगुती गणेश मुर्त्या विक्रीची दुकाने सजली होती. विविध आकारात, रंगात, रूपात अनेक गणेश मुर्त्या विक्रीस उपलब्ध होत्या. काहींनी आधीच मुर्त्या बुक केल्या होत्या. तर काहींनी वेळेवर मूर्त्याची निवड करीत गणपती बाप्पाला वाजत गाजत आपल्या घरी नेले.