भिवापूर: बिबट्याने गोठ्यातील कुत्र्याची शिकार, नांद परिसरात दहशत
नांद गावालगत असलेल्या सदाशिव चिरकुटराव दांडेकर यांच्या शेतातील गोठ्यात बांधून ठेवलेल्या कुत्र्यावर रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली याच ठिकाणी बिबट्याने कुत्र्याची शिकार करण्याची ही दुसरी घटना असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे