रामटेक: प्रारूप पुनर्रिक्षण मतदार यादीत नाव नसल्यास 30 सप्टेंबर पर्यंत आक्षेप घेता येणार; एसडीओ प्रियेष महाजन यांची माहिती
Ramtek, Nagpur | Sep 9, 2026 रामटेक विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी त्यांची नावे 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध प्रारूप मतदार यादीत पडताळणी करून घेणे आवश्यक असून काही त्रुटी अथवा नावात आक्षेप असल्यास 30 सप्टेंबर पर्यंत आक्षेप नोंदणी करावी असे आवाहन रामटेकचे उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन यांनी मतदारांना केले आहे. बुधवार दिनांक 9 सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता तहसील कार्यालय रामटेक येथे आयोजित पत्र परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.यावेळी तहसीलदार रमेश कोळपे सुद्धा उपस्थित होते.