रामटेक: सावरा फाटा येथे ट्रक व पिकअपच्या धडकेत पिकअप उलटली ; कुठलीही जीवित हानी नाही
Ramtek, Nagpur | Sep 23, 2026 नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील वडांबाच्या पुढे सावरा फाटा येथे ट्रक व पिकअप च्या अपघातात पिकअप वाहन उलटले. तेवीस सप्टेंबरला मध्यरात्री झालेल्या या अपघातात पिकअप वाहनाचा चालक व वाहक थोडक्यात बचावले. तर ट्रक चालक ट्रक सोडून घटनास्थळावरून पसार झाला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.