हिंगणा: संघर्ष नगर परिसरात विहिरीत बुडल्याने तरुणाचा मृत्यू 0
Hingna, Nagpur | May 21, 2026 फिर्यादी व त्याचे मित्र यश मोरेश्वर बेलखेडे वय २१ वर्ष व रितेश हराडे हे पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीत संघर्षनगर, जयताळा येथील राजू पाटील यांचे शेतात आंबे तोडायला गेले होते. शेतातील विहीरीमध्ये यश मोरेश्वर बेलखेडे हा पोहण्याकरीता उतरला असता, विहीरीचे पाण्यात बुडाल्याने मरण पावला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .पुढील तपास सुरू आहे.