हिंगणा: हिंगण्यात अवैध उत्खननासाठी टेकड्यांना सुरंग तहसील प्रशासनाचे हातावर हात
Hingna, Nagpur | Jun 4, 2026 मोहगाव आणि मेटाउमरी परिसरात अवैध मुरूम उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या उत्खननामुळे पर्यावरणाला बाधा व महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.स्थानिकांच्या मते, हिंगणा तहसीलला मागील काही महिन्यांपासून कायमस्वरूपी तहसीलदार नाही. त्यामुळे अवैध उत्खननाचे प्रकार वाढले आहेत. जेसीबी आणि डम्परच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात टेकड्यांना सुरुंग लावण्यात येत आहे.