रामटेक: रामटेक तालुक्यात दुसऱ्या यादीत 828 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा
Ramtek, Nagpur | Sep 14, 2026 राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत रामटेक तालुक्यातील दुसऱ्या यादीत 53 गावातील 828 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून पहिल्या यादीत 1250 शेतकरी खातेदारांना लाभ मिळाला होता. त्यामुळे आतापर्यंत रामटेक तालुक्यातील 2078 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा मिळाला असल्याची माहिती रामटेक तालुका सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक अतुल कुमार वानखेडे यांनी दिली