नागपूर शहर: चिखली-कलमना येथे अवैध गॅस रिफिलिंगवर धडक कारवाई; २०० हून अधिक सिलिंडर जप्त
11सप्टेंबरला सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूरमधील चिखली-कलमना परिसरात अवैधरित्या गॅस रिफिलिंग व सिलिंडर साठवणूक करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाच्या भरारी पथकाने धडक कारवाई केली आहे.जिल्हा पुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ अधिकारी आणि पुरवठा निरीक्षकांच्या पथकाने केलेल्या या तपासणीत घरगुती व व्यावसायिक वापराचे २०० पेक्षा अधिक गॅस सिलिंडर आढळून आले.सदर ठिकाणी अनधिकृतपणे गॅस रिफिलिंग सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, पथकाने कागदपत्रे व सिलिंडर जप्त करून