नागपूर शहर: 'इडा-पीडा घेऊन जा गे मारबत' ,नागपूरच्या ऐतिहासिक मारबत आणि बडग्या महोत्सवाचे उत्साहात आयोजन;
नागपूरच्या १४५ वर्षांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा लाभलेल्या प्रसिद्ध 'मारबत आणि बडग्या महोत्सवा'चे यंदाही शहरात अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले. काळी आणि पिवळी मारबतची पारंपरिक पूजा केल्यानंतर या ऐतिहासिक मिरवणुकीला सुरुवात झाली. संपूर्ण मिरवणूक मार्गावर नागरिकांकडून ‘इडा-पीडा घेऊन जा गे मारबत’ असा एकच जयघोष करण्यात आला.