नागपूर शहर: रेल्वे भरती परीक्षात मोठा गैरव्यवहार: मूळ परीक्षार्थींच्या जागी परीक्षा दुसऱ्यांनी दिली परीक्षा : नितीन चंद्र राजकुमार
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी 8 सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता दिलेल्या माहितीनुसार,रेल्वे भरती सेलतर्फ आयोजित ग्रुप 'डी'च्या शारीरिक परीक्षेत, मूळ परीक्षार्थ्यांच्या ऐवजी परीक्षा देणाऱ्या २ बनावट उमेदवारांचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी अजिनी पोलिसांनी चारही आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी दिली आहे.