नागपूर शहर: घरफोडी प्रकरणातील पाहिजे आरोपी अटकेत, सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त, युनिट 6 ची कार्यवाही
कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या फिर्यादीच्या घराचे कुलूप व कडी-कोंडा तोडून अज्ञात चोराने घरात प्रवेश केला.बेडरूममधील आलमारीतील १०,००० रुपये रोख, सोन्याचे विविध दागिने, चांदीचे सिक्के आणि डायमंड वॉच असा एकूण ८,३८,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.गुन्हे शाखा युनिट ६ ने तांत्रिक तपास करून यापूर्वी ४ आरोपींना अटक केली होती व आता फर्दीन राजीक शेख या पाहिजे आरोपीला अटक करण्यात आली आहे.आरोपीकडून २० ग्रॅम सोन्याची लगड व १२० ग्रॅम चांदी असा एकूण ४,४०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्