कल्याण गांधारी गावात लोढा गार्डन गेटजवळ नाग आढळला; सर्पमित्रांनी केले सुरक्षित रेस्क्यू
कल्याण :कल्याणमधील गांधारी गाव परिसरातील लोढा गार्डनच्या गेटजवळ नाग आढळून आल्याने परिसरात काही काळ नागरिकांमध्ये उत्सुकता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नाग दिसताच नागरिकांनी सतर्कता दाखवत सर्पमित्रांना याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता बोंबे आणि ज्ञानेश्वर सुतार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत सावधगिरीने आणि योग्य पद्धतीने नागाला सुरक्षितपणे रेस्क्यू केले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य धोका टळला असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
Kalyan, Thane | Nov 13, 2026