KDMC शाळांतील विद्यार्थ्यांची थेट इसरोला भरारी! ३० विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची पहिली संधी; तिरुवनंतपुरममध्ये अनुभवणार अंतराळ संशोधनाचे विश्व!
शिक्षण सभापती अभिजीत थरवळ यांचा पुढाकार; शैक्षणिक सहलीतून विद्यार्थ्यांना विज्ञान आणि अंतराळ संशोधनाची प्रत्यक्ष माहिती मिळणार
कल्याण : KDMC शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची आणि प्रेरणादायी संधी उपलब्ध होणार आहे. महापालिका शाळांतील सुमारे ३० विद्यार्थ्यांना थेट भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इसरो (ISRO) ला भेट देण्याची विशेष संधी मिळणार आहे. केरळमधील तिरुवनंतपुरम येथे आयोजित करण्यात येणाऱ्या या विशेष शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाचे जग जवळून अनुभवता येणार आहे.
विशेष म्हणजे, या सहलीच्या निमित्ताने अनेक विद्यार्थ्यांना आयुष्यात पहिल्यांदाच विमानाने प्रवास करण्याचा रोमांचक अनुभव मिळणार आहे. आतापर्यंत पुस्तकांमध्ये आणि चित्
Kalyan, Thane | Nov 13, 2026