उल्हास नदीच्या प्रदूषणाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक! मृत माशांची टोपली घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धडक!
अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर मृत माशांची टोपली ठेवत व्यक्त केला संताप; रासायनिक कंपन्यांकडून नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर कारवाईची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा!
कल्याण : उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरातून वाहणाऱ्या उल्हास नदीतील मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळून आल्याने नदी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. परिसरातील रासायनिक कंपन्यांकडून प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असून, याचा धोका नागरिकांसह नदीतील जलचर प्राण्यांनाही निर्माण झाला आहे.या गंभीर प्रकाराबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत राष्ट्रव�
Kalyan, Thane | Nov 13, 2026