कळमेश्वर: नागपूर मार्गावरील फेटरी येथे भीषण अपघात, पुलावरून दुचाकी कोसळली आता बोलू नका
नागपूर रोडवरील फेटरी येथे भीषण अपघात; ब्रिजवरून दुचाकी खाली कोसळली,दिव्यांशी फाउंडेशन व पोलीस प्रशासनाच्या मदतीने गंभीर जखमीला नागपूर मेडिकल येथे हलविले,नागपूर रोडवरील हनुमान मंदिराजवळ, फेटरी येथे दिनांक १७ ऑक्टोबर रोजी भीषण अपघात घडला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीस्वाराची गाडी पुलावरून खाली कोसळली. या अपघातात दिलीप बावणे (वय अंदाजे ४८ वर्षे, रा. कोहळी-मोहळी, ता. कळमेश्वर) हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.